Ganorkar, Prabha

Asha Bage Yanchya Nivdak Katha (आशा बगे यांच्या निवडक कथा) - 1st Edition - Pune Padmagandha Prakashan 2018 - 256p. Soft/Paper Bound

आशा बगे यांच्या कथा रूढ, पारंपरिक पद्धतीच्या कुटुंबकथा नाहीत. त्या मानवी नात्यांच्या कथा आहेत. या कथांमधल्या पात्रांचे इतरांशी निर्माण झालेले नाते शुद्ध मानवी आणि अस्सल आहे. गाढ आणि चटका लावणारे, अनोखे आहे. ह्या नात्यांतून गरज, स्वार्थ, तात्पुरता व्यवहार गळून पडतो आणि वाचकांसाठी उरते ती निखळ मानवी मर्मबंधाची प्रचिती. आशा बगे यांची कथा गंभीर आहे. केवळ रंजन हा तिचा उद्देश नाही. त्यांची दृष्टी जगण्याकडे आणि ते जगणे वाट्याला आलेल्या माणसांकडे ममत्वाने पाहणारी आहे. त्यांची स्निग्ध, सश्रद्ध, मूल्यभान ठेवणारी आणि माणसांमधल्या ओलाव्याकडे घेऊन जाणारी वृत्ती हे ह्या कथांचे मर्म आहे. प्रभा गणोरकर ह्या मराठीतील नामवंत कवयित्री, समीक्षक आहेत. त्यांनी प्रामुख्याने कविता लिहिल्या असल्या तरी गेली कित्येक वर्षे मराठी साहित्याचे मर्मग्राही विश्लेषण करीत आहेत. आशा बगे यांच्या आजवरच्या कथालेखनातून त्यांनी निवडलेल्या काही कथा ह्या संग्रहात संकलित - संपादित केल्या आहेत. ह्या संग्रहाला त्यांची विवेचक प्रस्तावनाही जोडलेली आहे.


Marathi

9789386594204


Marathi, Marathi कथासंग्रह, Marathi Katha

M891.463 / GAN/ASH