Deshpande P.L.

Gaatoda - 1 - Mumbai Parchure Prakashan Mandir 2012 - 221 22cms

ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या प्रासंगिक लेखांचा हा संग्रह. यातील काही लेख हे अगदी दुर्मिळ या गटातीलच आहेत. काही स्मरणिकांसाठी लिहिलेले हे लेख या पुस्तकामुळे वाचायला मिळणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त वसंतराव सराफ यांना पाठवलेले पत्र हे दोन लेख वाचनीय तर आहेच, पण "पुलं'ची मार्मिक भाषाशैली व अचूक निरीक्षण याचा प्रत्यय यात येतो. संगीत, साहित्य, काव्य यासंबंधीचे चिंतनात्मक लेखन तसेच आजच्या नाटकासंबंधीचे त्यांचे मत अशा विविध लेखांचा यात समावेश आहे. आपले आजोळचे गाव कारवार व तेथील मंडळींबद्दल लिहिलेला लेख व्यक्ती आणि वल्लीची आठवण करून देतो. भाऊ मराठे यांनी या लेखांचे संकलन केले आहे. यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत व शोधमोहीम यातील लेखांचे वैविध्य पाहिल्यावर लक्षात येते.


Marathi

978-918086-045-4


सदरलेखन संग्रह,
Collection of stories
R21-22

891.462 / des/gan